योगानंद सहकारी सहनिवासाचा २३ वा वर्धमान दिन.
दिनांक २२ - १ - २०१० आणि दिनांक २४ - १ -२०१० या कालावधी मध्ये साजऱ्या होणारया योगानंद सहकारी सहनिवासाच्या २३ व्या वर्धमान दिनाचे औचित्य साधून सोसायटीने यंदा वयाची पंच्यात्तारी गाठलेल्या जेष्ठ सभासदांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार समारंभाचा एक आगळा वेगळा आणि हृद्य उपक्रम साजरा केला.
मी एक सत्काराठी सभासद असल्यामुळे बोलतोय आसे मुळीच नाही, तर समारंभाचे आरेखन, आयोजन, इतके संयमी आणि शिस्तबद्ध होते कि भव्य प्रमाणावर उपस्थित आस्लेत्या जेष्ठ सभासदांची बैठकीची वेगळी केलेली व्यवस्था व त्यांच्या जागेवर जाऊन अध्यक्षांसह कार्यकारिणी सभासदांनी केलेला सत्कार, जेणेकरून वृद्ध सभासदांना व्यासपीठावर येण्याजाण्याचा त्रास होणार नाही व वेळेचा अपव्यय टळेल याचा विचार करून केलेली व्यवस्था हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ होते.
हा सर्व समारंभ एक घरगुती समारंभ आहे असेच जाणवत होते कारण त्या मध्ये औपचारिकता नसून आत्यंतिक जिव्हाळा व प्रेम ओसंडून जात असल्याचा आभास नव्हे तर प्रत्यय येत होता. सत्कारार्थीचे आप्ताची व मित्रांची कार्यक्रमातील लक्षणीय उपस्थिती हे या कार्यक्रमाचे विशेष.
या कार्यक्रमाचे निमित्ताने प्रसारित केलेल्या " आवतन" या आमन्त्रानाच्या संकल्पनेपासूनच त्याची प्रचीती येते. या कार्यक्रमाची सुरवात जाणकार भ्रम्हावृदांनी केलेल्या वेदोक्तामान्त्रानी झाल्यामुळे, वैदिक आशीर्वाद मिल्यालाच्या आनंदाने समस्त वृद्ध सभ्सादाचे डोळ्यामध्ये आनंदाश्रू उउभे राहिल्याचे जाणवत होते.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करताना कार्यकारिणीचे सभासद, तरुण उत्साही रहिवाश्यांचा सहभाग व आबाल वृद्धानाही आपला घरच्यांचा कार्यक्रम असल्याची जाणीव संवेदना निर्माण करण्याकरता सर्वाना एकत्र गुंफणारा दिग्दर्शक म्हणून श्री आमोद मुसळे व समारंभाचे खुसखुशीत पण वास्तव रेखांकन करणाऱ्या शोभाताई यांचा या याश्स्वीतेमध्य सिंहाचा वाटा आहे.
भारतीय संस्कृतीचा प्राण असलेली "सन्मानाने जगा, आणि दुसर्याला सन्मानाने जगण्यास मदत करा हि संकल्पना पुढील येणाऱ्या पिढ्यांना संदेश देणारी असल्यामुळे भविष्यात आशयाच प्रकारचे कार्यक्रम होवोत हीच सदिच्छा.
टीप: वरील लेख हा योगानंद सहनिवासातील एक सहकारी यांनी लिहिला आहे.
No comments:
Post a Comment