
जाने भी दो यारो या पिक्चर ला २५ वर्षे पूर्ण झाली. मला आवडलेल्या पिक्चर पैकी हा एक उत्कृष्ट चित्रपट. या चित्रपटातील एक एक कलाकार काय मस्त होते. त्या पैकी रवी वासवानी यांचे आताच निधन झाले. त्या मुळेच जाने भी दो.... च्या आठवणी अधिकच ताज्या झाल्या. यातील कालाल्कारांपैकी भक्ती बर्वे पण आता हयात नाहीत. तसेच बाकी सहकलाकार आता वयस्कर झाले आहेत. नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, सतीश शाह यांच्या शिवाय आता सिनेश्रुष्टीत फारसे कोणी दिसत नाही. काहीची नवे विस्मरणात गेली आहेत, पण त्यांनी केलेला अभिनय आजही मनात घर करून राहिलाय.
या चित्रपटात वापरलेला प्लॉट काय सुरेख आहे, दोन बे रोजगार फोटोग्राफर, त्यांना मिळालेला एक फोटो त्यातून तयार झालेलं रहस्य नाट्य आणि या रहस्याचा माग घेताना खुललेली एक कॉमेडी.... वा क्या बात है. हि सगळी खिचडी जमवून आणल्या बद्दल कुंदन शाह या दिग्दर्शकाला salut
याच चित्रपटाची थीम घेऊन प्रियदर्शन या दक्षिणात्य दिग्दर्शकाने अनेक चित्रपट काढले, काही चालले तर काही पार आपटले. या पैकी हेराफेरी, भूल भुलय्या, हल चल वैगीरे खासच पण बाकी सगळी भागम भागच.
No comments:
Post a Comment